बातम्या
अखेर कॉ. शिवाजी गुरव यांच्या प्रयत्नांना यश*
By nisha patil - 11/24/2025 4:54:30 PM
Share This News:
अखेर कॉ. शिवाजी गुरव यांच्या प्रयत्नांना यश*
आजरा(हसन तकीलदार):-ता. आजरा येथील हालेवाडी ते उत्तूर दरम्यान रस्त्यांच्यावर खड्डे पडले होते त्यामुळे वाहन चालकांना येथून वाहने चालवताना खुप कसरत करावी लागत होती. अपघात होऊन एखादी जिवीत हानी होण्याची दाट शक्यता होती.
यासाठी आरदाळ ता. आजरा येथील सामाजिक कार्यकर्ते कॉ. शिवाजी गुरव यांनी दि. 18/11/2025 रोजी बांधकाम विभाग तसेच आजरा तहसीलदार यांना ही खड्डे मुजवण्यासाठी निवेदन दिले होते. जर ही खड्डे मुजवून रस्त्याची दुरुस्ती केली नाही तर शुक्रवार दि. 28/11/2025 रोजी उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभागासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. प्रशासनाने याची दखल घेत तातडीने रस्त्याच्या दुरुस्तीचे चांगल्या प्रतीचे काम सुरु केले आहे.
याबाबत कॉ. शिवाजी गुरव यांनी प्रशासन तसेच मीडियाचे आभार मानले. तसेच पुढे ते म्हणाले की, प्रशासनाने वेळीच जर अशी कामे केली तर आंदोलने किंवा निवेदने देण्याची गरजच भासणार नाही. त्यामुळे प्रशासनाने यापुढे समस्यांचे वेळीच निराकरण करण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
अखेर कॉ. शिवाजी गुरव यांच्या प्रयत्नांना यश*
|