बातम्या
राधानगरी व गारगोटी येथे वित्तीय समावेशन मेगा शिबिर उत्साहात संपन्न
By nisha patil - 10/9/2025 3:35:28 PM
Share This News:
राधानगरी व गारगोटी येथे वित्तीय समावेशन मेगा शिबिर उत्साहात संपन्न
कोल्हापूर, दि. 10: वित्तीय समावेशन संपृक्तता मोहिमेअंतर्गत राधानगरी व गारगोटी येथे मेगा शिबिरे पार पडली. दि. 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2025 दरम्यान ग्रामपंचायत स्तरावर ही मोहीम राबवली जात असून, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, अग्रणी जिल्हा बँक कार्यालय आणि विविध बँकांनी यात सहभाग घेतला.
शिबिरात सामाजिक सुरक्षा योजना, अटल पेन्शन योजना, डिजिटल व्यवहार, री-केवायसीचे महत्त्व आणि फसवणूक प्रतिबंध याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
🔹 मुख्य महाव्यवस्थापक संदीप कुमार (RBI) यांनी सामाजिक सुरक्षा योजनांचे महत्त्व स्पष्ट करत आर्थिक समावेशनाचे उद्दिष्ट दारिद्र्य निर्मूलन व जीवनमान उंचावणे असल्याचे सांगितले.
🔹 डॉ. ज्योती सक्सेना (RBI) यांनी वित्तीय समावेशन हा प्रत्येक नागरिकाचा हक्क असल्याचे सांगत डिजिटल व्यवहाराचा प्रसार करण्याचे आवाहन केले.
🔹 बँक अधिकारी विक्रम भिडे (IDBI), के. दुर्गा (बँक ऑफ महाराष्ट्र), बिस्वजीत गुहा (बँक ऑफ इंडिया), हर्ष राजपाल (SBI) यांनी विमा योजना, री-केवायसी व डिजिटल फसवणूक प्रतिबंध याबाबत माहिती दिली.
कार्यक्रमात ग्रामस्थांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना व अटल पेन्शन योजना यांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.
शेवटी, बँक ऑफ इंडिया झोनल मॅनेजर पुनीत द्विवेदी यांनी मान्यवरांचे आभार मानले.
राधानगरी व गारगोटी येथे वित्तीय समावेशन मेगा शिबिर उत्साहात संपन्न
|