बातम्या

आजरा साखरच्या त्या दोन्ही कर्मचाऱ्यांना अपघाती विमा रकमेची आर्थिक मदत

Financial assistance of accident insurance amount

By Administrator - 2/19/2026 2:50:06 PM
Share This News:

आजरा साखरच्या त्या दोन्ही कर्मचाऱ्यांना अपघाती विमा रकमेची आर्थिक मदत
 
आजरा (हसन तकीलदार):-वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यातील अपघाती निधन झालेल्या त्या दोन कामगारांच्या वारसांना आर्थिक मदत करण्यात आली आहे.
     
वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याने आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी कारखाना व कर्मचारी यांनी मिळून संयुक्तपणे न्यू इंडिया कंपनीची अपघाती विमा योजना सुरू केली आहे.

या विमा योजनेतून कारखान्याच्या अपघाती निधन झालेल्या प्रकाश घेवडे, सुहास बुगडे यांच्या वारसांना प्रत्येकी रू. १० लाख आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द केला.यावेळी चेअरमन, व्हा. चेअरमन,सर्व संचालक तसेच कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते.

आजरा साखरच्या त्या दोन्ही कर्मचाऱ्यांना अपघाती विमा रकमेची आर्थिक मदत
Total Views: 291