विशेष बातम्या

प्लॅस्टिकचा वापर व उघडयावर कचरा टाकणा-या व्यापाऱ्यास दंड

Fine for traders using plastic and throwing garbage in the open


By nisha patil - 6/6/2025 8:52:34 PM
Share This News:



प्लॅस्टिकचा वापर व उघडयावर कचरा टाकणा-या व्यापाऱ्यास दंड
 

कोल्हापूर ता.06 : महालक्ष्मी मंदिर परिसर येथील दोन व्यापारी व एक नागरीकास उघडयावर कचरा टाकल्याने व दुकानांत प्लास्टिक पिशवीचा वापर करत असल्याने या तिघांनवर आरोग्य विभागामार्फत रु. 8500/-चा दंड कारण्यात आला. ही कारवाई अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, सहा.आयुक्त स्वाती दुधाणे व मुख्य अरोग्य निरिक्षक डॉ.विजय पाटील यांच्या मार्गदर्शानाखाली करण्यात आली. 
    

अंबाबाई मंदिर परिसारतील जगदंबा साडी सेंटर येथे सहा.आयुक्त स्वाती दुधाणे व आरोग्य निरिक्षकांने पाहणी केली असता दुकानांत सिंगल युज प्लास्टिक पिशव्या वापरत असल्याचे दिसून आल्याने यांना रु. 5000/-दंड करण्यात आला. तसेच नागरीक सुदर्शन पुजारी व हॉटेल उडपी अलंकार मधील कर्मचाऱ्यांनी उघडयावर कचरा टाकताना आरोग्य निरिक्षकासह कर्मचा-यांना आढळून आले. यावेळी सुदर्शन पुजारी यांना रु.1500/- तर हॉटेल उडपी अलंकार व्यापाऱ्यास रु. 2000/- चा दंड करण्यात आला. सदरची कारवाई आरोग्य निरिक्षक सुशांत कांबळे, शुभांगी पोवार, विभागीय आरोग्य निरिक्षक नंदकुमार पाटील, सिटी कॉर्डिनेटर मेघराज चडवानकर व कर्मचाऱ्यांनी केली. 


प्लॅस्टिकचा वापर व उघडयावर कचरा टाकणा-या व्यापाऱ्यास दंड
Total Views: 82