बातम्या
चैत्र पोर्णिमा यात्रेसाठी अग्निशामक दल सतर्क
By Administrator - 11/4/2025 4:16:29 PM
Share This News:
चैत्र पोर्णिमा यात्रेसाठी अग्निशामक दल सतर्क
२४ तास कार्यरत तुकडी तीन दिवस सज्ज
पंचगंगेच्या किनारी 'लाईफ टाईम बोट' आणि दोन अग्निशामक गाड्या सज्ज
चैत्र पोर्णिमेनिमित्त जोतिबा यात्रेसाठी पंचगंगा नदीच्या किनारी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाने विशेष उपाययोजना केल्या आहेत. दुर्घटना टाळण्यासाठी अग्निशामक दलाचे एक विशेष पथक तैनात करण्यात आले आहे.
संभाव्य दुर्घटना आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी अग्निशामक दलाने ‘लाईफ टाईम बोट’ सह दोन अग्निशामक गाड्या सज्ज ठेवल्या आहेत.
या पथकात एकूण १२ प्रशिक्षित जवानांचा समावेश आहे. ही विशेष तुकडी सलग तीन दिवस २४ तास कार्यरत राहणार आहे. यात्रेच्या काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी दलाच्या वतीने नदीकिनारी सतत नजर ठेवली जाणार आहे.
चैत्र पोर्णिमा यात्रेसाठी अग्निशामक दल सतर्क
|