विशेष बातम्या
विधानभवन परिसरात शॉर्टसर्किटमुळे आग; मोठी दुर्घटना टळली
By nisha patil - 5/19/2025 3:36:46 PM
Share This News:
विधानभवन परिसरात शॉर्टसर्किटमुळे आग; मोठी दुर्घटना टळली
मुंबईतील विधानभवन परिसरात रिसेप्शन एरियामधील स्कॅनिंग मशिनमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली. धुराचे लोट पाहून परिसरात काही काळ गोंधळ निर्माण झाला. मात्र, फायर एक्स्टिंग्विशरच्या मदतीने आग तत्काळ आटोक्यात आणण्यात आली.
कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, आमदार आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घटनास्थळी पाहणी केली. अग्निशमन दल अलर्ट मोडवर असून स्कॅनिंग मशिनची चौकशी सुरू आहे.
विधानभवन परिसरात शॉर्टसर्किटमुळे आग; मोठी दुर्घटना टळली
|