ताज्या बातम्या
आजरा साखर कारखान्यात आग सुरक्षा प्रात्यक्षिके व चर्चासत्र संपन्न.
By nisha patil - 1/24/2026 3:25:58 PM
Share This News:
आजरा साखर कारखान्यात आग सुरक्षा प्रात्यक्षिके व चर्चासत्र संपन्न.
आजरा(हसन तकीलदार) :- गवसे तालुका आजरा येथील वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यामध्ये आग आणि सुरक्षा(फायर अँड सेफ्टी) याविषयी चर्चासत्र व प्रात्यक्षिके उत्साहात संपन्न झाले.
सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांच्या मध्ये जागरूकता वाढली पाहिजे या उद्देशाने या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. साखर कारखान्यामध्ये सुरक्षा विभागाकडील कर्मचारी हा कायम तीन शिफ्ट मध्ये काम करीत असतो त्यामुळे खास करून सुरक्षा विभागाकडील कर्मचाऱ्यांच्यासाठी या चर्चासत्र व प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कारखान्यात आगीसारख्या दुर्घटना होऊ नयेत म्हणून काय काळजी घ्यावयाची, आपल्याकडे असणाऱ्या हायड्रंट सिस्टीमचा वापर कसा करावयाचा, फायर इन्स्टिट्यूशन कसे वापरायचे, असेंबली पॉईंटचा वापर कसा करायचा, आपत्कालीन परिस्थितीमध्ये एकमेकांना सहकार्य कसे करावे .
याविषयीची सविस्तर माहिती आणि प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. चर्चासत्रामध्ये ट्रेनर म्हणून गडहिंग्लज येथील दीप फायरचे अरविंद देसाई यांनी काम पाहिले. यावेळी कारखान्याचे सुरक्षा अधिकारी जगदीश देसाई, सेफ्टी ऑफिसर रमेश देसाई यांच्यासह इतर विभागाचे ही प्रमुख कर्मचारी उपस्थित होते. सेमिनार यशस्वी पार पाडण्यासाठी कार्यकारी संचालक एस. के.सावंत यांचे मार्गदर्शन लाभले.
आजरा साखर कारखान्यात आग सुरक्षा प्रात्यक्षिके व चर्चासत्र संपन्न.
|