बातम्या
फिरगाई तालीम मिरवणूक उत्साहात संपन्न
By nisha patil - 8/9/2025 2:39:33 PM
Share This News:
फिरगाई तालीम मिरवणूक उत्साहात संपन्न
मालोजीराजे व विविध पक्षांचे नेते एकत्र – भक्तीमय वातावरणात मिरवणुक संपन्न
कोल्हापूर : शहरातील फिरगाई तालीम मंडळाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाला कोल्हापूरचे छत्रपती मालोजीराजे, शिवसेना जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे, काँग्रेसचे सचिन चव्हाण, पोलीस अधिकारी प्रिया पाटील, जुना राजवाडा पोलीस स्टेशनचे अधिकारी झाडे साहेब, शिवसेना वाहतूक जिल्हाप्रमुख हर्षल पाटील यांसह मान्यवरांची उपस्थिती होती.
शिस्तबद्ध पद्धतीने आणि ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक निघाली. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे गणेशभक्तांचा उत्साह द्विगुणित झाला. संपूर्ण परिसरात भक्तीमय आणि उत्सवी वातावरण निर्माण झाले.
फिरगाई तालीम मिरवणूक उत्साहात संपन्न
|