विशेष बातम्या
३७५१ रुपयांवर ठाम — तोडगा न निघाल्यास स्वाभिमानींचे भूमिगत आंदोलन
By nisha patil - 1/11/2025 5:05:35 PM
Share This News:
३७५१ रुपयांवर ठाम — तोडगा न निघाल्यास स्वाभिमानींचे भूमिगत आंदोलन
३४०० ते ३४५० उचल नको; सरकार-कारखानदारांवर राजू शेट्टींचा इशारा!
सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी जाहीर केलेली ३४०० ते ३४५० रुपयांची पहिली उचल आम्हाला मान्य नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला. ऊस परिषदेत ठरलेल्या ३७५१ रुपयांवर तोडगा न निघाल्यास स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी भूमिगत होऊन आंदोलन तीव्र करावे, असे आदेश त्यांनी दिले.
सरकार आणि कारखानदारांनी या मुद्याकडे दुर्लक्ष केले तर ५ नोव्हेंबरला मुख्यमंत्री कोल्हापूर दौऱ्यावर असताना आंदोलनाचा भडका उडेल, असा इशारा शेट्टी यांनी दिला. तर ७ नोव्हेंबर रोजी निगवे (ता. करवीर) येथून पुढील आंदोलनाची घोषणा करण्यात येणार आहे.
३७५१ रुपयांवर ठाम — तोडगा न निघाल्यास स्वाभिमानींचे भूमिगत आंदोलन
|