बातम्या
दत्तवाड पंचक्रोशीतील पहिली मुस्लिम महिला वकील; सानिया यासीन दानवाडे यांचा सत्कार
By nisha patil - 6/14/2025 10:18:26 PM
Share This News:
दत्तवाड पंचक्रोशीतील पहिली मुस्लिम महिला वकील; सानिया यासीन दानवाडे यांचा सत्कार
दत्तवाड (रवी धुमाळे): दत्तवाड मुस्लिम समाज अध्यक्ष यासीन दानवाडे यांची कन्या सानिया यासीन दानवाडे हिने एल.एल.बी. (LLB) परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण करून दत्तवाड पंचक्रोशीतील पहिली मुस्लिम महिला वकील ऍडवोकेट होण्याचा मान पटकावला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल भारतीय जनता पार्टी दत्तवाड व गुमटे-पाटील परिवाराच्या वतीने सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.
या प्रसंगी भाजपा किसान मोर्चा कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष राजगोंडा पाटील, सुधाकर पट्टेकरी, माजी सरपंच ए.सी. पाटील, रमेश खरपी, सुनील कुंभार, मनोज पोवार, तसेच पाटील व दानवाडे कुटुंबीय उपस्थित होते.
सानिया दानवाडे हिच्या या यशामुळे पंचक्रोशीत आनंदाचे व अभिमानाचे वातावरण असून, समाजातील महिलांसाठी प्रेरणादायी पाऊल ठरले आहे.
Yasin Danwade :दत्तवाड पंचक्रोशीतील पहिली मुस्लिम महिला वकील; सानिया यासीन दानवाडे यांचा सत्कार
|