बातम्या

एम.कॉम.परीक्षेतील ऍडव्हान्स टॅक्सेशन मध्ये मृणाल काळेबेरे विद्यापीठात पहिली

First in Advance Taxation


By nisha patil - 11/19/2025 3:33:52 PM
Share This News:



एम.कॉम.परीक्षेतील ऍडव्हान्स टॅक्सेशन मध्ये मृणाल काळेबेरे विद्यापीठात पहिली

शहाजी महाविद्यालयात तिचा सत्कार संपन्न 

कोल्हापूर : शहाजी महाविद्यालयातील एम. कॉम.विभागातील विद्यार्थिनी  कुमारी मृणाल एम.काळेबेरे हीने  मार्च एप्रिल 2025 मध्ये शिवाजी विद्यापीठांतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये ऍडव्हान्स टॅक्सेशन या विषयात विद्यापीठांमध्ये प्रथम येण्याचा बहुमान पटकावला.त्याचबरोबर कै. दत्तात्रय कुलकर्णी जांभळीकर व कै. भूषण भाटे स्मृती पारितोषिक तिला प्राप्त झाले आहे.
 

तिचे श्री शाहू शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग दादा बोंद्रे  व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर के शानेदिवाण तसेच त्यांना शिकवणारे प्रा. डॉ एम. ए. शिंदे, प्रा.डॉ.सौ.सी.के.पाटील व एम कॉम विभागातील आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक , शिक्षिकेतर कर्मचारी यांच्यावतीने तिचे  अभिनंदन करणेत आले. 
 

 या यशाबद्दल महाविद्यालयात तिचा सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांच्या हस्ते तिचा सत्कार झाला. यावेळी महाविद्यालयाचे प्रबंधक रवींद्र भोसले, अधीक्षक मनीष भोसले,डॉ.आर.डी.मांडणीकर, कॉमर्स विभाग प्रमुख प्रा. संतोष कांबळे, डॉ. एम.ए.शिंदे  सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सहकारी यावेळी उपस्थित होते.


एम.कॉम.परीक्षेतील ऍडव्हान्स टॅक्सेशन मध्ये मृणाल काळेबेरे विद्यापीठात पहिली
Total Views: 146