बातम्या

डी. वाय. पाटील फार्मसीची अपेक्षा - राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम

First in the state level oratory competition


By nisha patil - 4/30/2026 1:44:59 PM
Share This News:



डी. वाय. पाटील फार्मसीची अपेक्षा - राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम


कोल्हापूर:  डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीची  विद्यार्थिनी अपेक्षा चित्रे हिने गौरिशंकर एज्युकेशन सोसायटीच्या सातारा कॉलेज ऑफ फार्मसी येथे झालेल्या १८ व्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

 
“आरोग्य क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता (AI in Healthcare)” या विषयावर अपेक्षा हिने प्रभावी व अभ्यासपूर्ण मते मांडत परीक्षकांची मने जिंकली. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयाचा गौरव वाढला आहे.


या यशाबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जंगमे यांनी अभिनंदन केले आहे.


डी. वाय. पाटील फार्मसीची अपेक्षा - राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम
Total Views: 5