बातम्या

इचलकरंजीत 10 ते 12 फूट गणेश मूर्ती अंगावर कोसळून पाच जण जखमी

Five injured after 10 to 12 feet Ganesh idol


By nisha patil - 8/26/2025 1:27:37 PM
Share This News:



इचलकरंजीत 10 ते 12 फूट गणेश मूर्ती अंगावर कोसळून पाच जण जखमी


खड्ड्यांमुळे ट्रॉली असंतुलित; मूर्ती कार्यकर्त्यांवर कोसळली


  इचलकरंजीत परिसरात गणेशमूर्ती नेत असताना मोठा अपघात घडला. ड्रेनेज खुदाईसाठी केलेल्या खड्ड्यांमुळे मूर्ती वाहून नेणारी ट्रॉली असंतुलित होऊन उलटली. यात पाच कार्यकर्ते जखमी झाले असून, एकाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

हा अपघात कबनूर परिसरातील कोल्हे मळा येथील शिवस्वराज्य गणेशोत्सव मंडळाची १० ते १२ फूट उंचीची मूर्ती नेताना झाला. जवाहरनगर पोस्ट ऑफिसजवळ रात्री सुमारे आठच्या सुमारास ट्रॉली लडबडली व मूर्ती एका बाजूला कलंडली. त्या वेळी कार्यकर्ते ट्रॉलीजवळ असल्याने मूर्ती थेट त्यांच्या अंगावर कोसळली.

अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती अधिक चिंताजनक आहे. सर्व जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.


इचलकरंजीत 10 ते 12 फूट गणेश मूर्ती अंगावर कोसळून पाच जण जखमी
Total Views: 42