विशेष बातम्या
हातकणंगलेत पाच नव्या लालपरी प्रवाशांच्या सेवेत
By nisha patil - 11/8/2025 3:30:52 PM
Share This News:
हातकणंगलेत पाच नव्या लालपरी प्रवाशांच्या सेवेत
रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर नव्या बसेसचे लोकार्पण
हातकणंगले बस स्थानकाला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून मंजूर झालेल्या १० नव्या बसेसपैकी पहिल्या पाच लालपरी बसेस रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या. या बसेसच्या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने (बापू) यांच्या हस्ते, तर अध्यक्षस्थानी भाजपचे ज्येष्ठ नेते व जिल्हा परिषद सदस्य अरुणजी इंगवले (आण्णा) होते. नवीन बसेसच्या समावेशामुळे प्रवाशांची गैरसोय कमी होणार असून वाहतूक सेवा अधिक सुलभ होणार आहे. लोकार्पणानंतर आमदार माने आणि मान्यवरांनी नव्या बसेसची सफर केली. कार्यक्रमाला माजी जि.प. सदस्य प्रसाद खोबरे, भाजप पदाधिकारी, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार तसेच प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हातकणंगलेत पाच नव्या लालपरी प्रवाशांच्या सेवेत
|