बातम्या

कोल्हापूर पोलीस दलातील पाच जण निलंबित तर एकावर बडतर्फीची कारवाई.

Five people from the Kolhapur Police Force have been suspended and one has been dismissed


By Administrator - 11/4/2025 4:19:25 PM
Share This News:



कोल्हापूर पोलीस दलातील पाच जण निलंबित तर एकावर बडतर्फीची कारवाई.

पी एस आय ने तिसरं लग्न केल्याप्रकरणी निलंबन

कोल्हापूर पोलिस दलातील पाच जणांवर गैरवर्तन केल्या प्रकरणी पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत  कारवाई केलीय.चार जणांचे निलंबन केलं असून केलं असून एकाला बडतर्फ केलय.

यामध्ये शिरोळ पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक इम्रान मुल्ला यांनी तीन लग्न केले असल्याची तक्रार त्यांची  दुसऱ्या  पत्नीने वरिष्ठांच्याकडे केली होती.या तक्रारीची पडताळणी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.तर चंदगड पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस नाईक  राजाराम पावसकर यांनी दोन लग्न केल्याची तक्रार पहिल्या पत्नीने केली होती.त्या तक्रारीची पडताळणी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय.तसेच पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेले सहा.फौजदार कृष्णात ठाणेकर ,पोलिस कॉ.प्रेमसागर मधाळे आणि प्रकाश पाटील यांची गार्ड म्हणुन न्यायाधिशांच्या निवासस्थाना बाहेर ड्युटी असताना त्यांच्यावर कामात हलगर्जीपणाचा ठपका ठेवून निलंबनाची कारवाई करण्यात आली.

तर अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याने शाहुपुरी पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक चेतन घाटगे याच्यावर पोक्सो अंतर्गत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याने पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांनी चेतन घाटगे याला बडतर्फ केलंय.


कोल्हापूर पोलीस दलातील पाच जण निलंबित तर एकावर बडतर्फीची कारवाई.
Total Views: 189