बातम्या

कोतोलीत पत्र्याच्या शेडवर जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड पाच जण अटकेत

Five people have been arrested


By nisha patil - 1/9/2025 1:54:25 PM
Share This News:



कोतोलीत पत्र्याच्या शेडवर जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; पाच जण अटकेत

कोतोली (शहाबाज मुजावर ) :
 स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कोतोली गाव हद्दीतील चांभारकी शेताजवळील पत्र्याच्या शेडवर धाड टाकून सुरू असलेला जुगार अड्डा उध्वस्त केला. या कारवाईत तब्बल ३ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रकाश हिंदुराव लव्हटे (३५, रा. कणेरी रोड, कोतोली) याच्या मालकीच्या शेडमध्ये जुगार खेळ सुरू असल्याची माहिती मिळताच कारवाई करण्यात आली. त्यावेळी आरोपी संदिप नामदेव लव्हटे (३८), सर्जेराव श्रीपती मेगाणे (४४), दिपक शिवाजी गवळी (४५) व समर्थ पांडुरंग पाटील (३१) हे सर्वजण तीनपानी पत्त्याचा पलास नावाचा जुगार खेळताना पोलिसांच्या हाती सापडले.

कारवाईदरम्यान २२,५०० रुपये रोख, पाच मोबाईल हॅण्डसेट, पाच मोटारसायकली आणि पत्त्याचे संच असा एकूण ३,१३,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी पो.कॉ. सचिन शंकरराव जाधव यांनी फिर्याद दिली असून सर्व आरोपींविरुद्ध कायदा कलम ४ व ५ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


कोतोलीत पत्र्याच्या शेडवर जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; पाच जण अटकेत
Total Views: 547