बातम्या
ऊस तोडणी-वाहतूक दर निश्चित करा – राजू शेट्टी यांची साखर आयुक्तांकडे मागणी
By nisha patil - 7/23/2025 9:09:30 PM
Share This News:
ऊस तोडणी-वाहतूक दर निश्चित करा – राजू शेट्टी यांची साखर आयुक्तांकडे मागणी
राज्यातील साखर कारखाने ४० ते ६० टक्के ऊस कार्यक्षेत्राबाहेरून गाळप करत असल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केला आहे.
शेट्टी यांनी साखर आयुक्त सिध्दराम सालिमठ यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार,
➤ २५ किमी पर्यंतच्या गाळप उसासाठी तोडणी-वाहतूक दर प्रतिटन ८२२ रुपये (तोडणी ₹४४० + वाहतूक ₹३८२) निश्चित करण्यात यावा.
➤ २५ किमी बाहेरील ऊसाचा वाहतूक खर्च संबंधित कारखान्याकडून वसूल करण्यात यावा.
शेट्टी यांनी कारखान्यांकडून सादर होणाऱ्या खोट्या उत्पादन आकडेवारीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत पुढे कोणत्याही कारखान्याला गाळप परवाने वाढविण्यास मनाई करावी, अशी मागणी केली आहे.
ऊस तोडणी-वाहतूक दर निश्चित करा – राजू शेट्टी यांची साखर आयुक्तांकडे मागणी
|