विशेष बातम्या

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

Flag hoisting ceremony at the District Collector


By nisha patil - 8/15/2025 2:56:49 PM
Share This News:



पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

स्वातंत्र्य, त्याग व देशभक्तीची आठवण तिरंग्यात – आबिटकर

७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे ध्वजारोहण करण्यात आले. प्रसन्न वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात स्वातंत्र्याचा आनंद आणि त्यासोबत येणारी जबाबदारी यांची जाणीव नागरिकांना करून देण्यात आली.

पालकमंत्री आबिटकर यांनी तिरंगा ध्वजाला अभिवादन करताना सांगितले की, तिरंगा हा आपल्या अभिमानाचे प्रतीक असून स्वातंत्र्य संग्रामातील शूरवीरांचे त्याग, शहीदांचे बलिदान आणि देशभक्तीचा जाज्वल्य इतिहास यांची आठवण करून देतो.

या कार्यक्रमाला खासदार छत्रपती शाहू महाराज, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती मंजु लक्ष्मी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, लोकप्रतिनिधी, अधिकारी वर्ग व देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम देशभक्तीच्या जयघोषात पार पडला.


पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
Total Views: 110