बातम्या

गोकुळमध्ये सहकार सप्ताहानिमित्त ध्वजारोहण; नविद मुश्रीफ यांचे मार्गदर्शन

Flag hoisting on the occasion of Cooperative Week in Gokul


By nisha patil - 11/14/2025 2:52:40 PM
Share This News:



गोकुळमध्ये सहकार सप्ताहानिमित्त ध्वजारोहण; नविद मुश्रीफ यांचे मार्गदर्शन

 नेहरू जयंतीनिमित्त पुष्पांजली; शेतकऱ्यांसाठी सहकाराचे बळ वाढवण्याचा निर्धार

गोकुळतर्फे 72व्या अखिल भारतीय सहकार सप्ताहानिमित्त ताराबाई पार्क येथे सहकार ध्वजारोहण करण्यात आले. संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजारोहण व सहकार प्रतिज्ञा झाली. तसेच पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या १३६व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी मुश्रीफ म्हणाले की, “सहकारामुळे ग्रामीण भागातील शेतकरी सक्षम झाले असून गोकुळने शेतकऱ्यांच्या विकासासाठी सातत्याने काम केले आहे. पुढील काळातही सेवा, सुविधा आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सहकाराची ताकद वाढवत राहू.”

कार्यक्रमाचे स्वागत डॉ. एम. पी. पाटील यांनी केले आणि आभार डॉ. प्रकाश साळुंखे यांनी मानले. चेअरमन नविद मुश्रीफ, विश्वास पाटील, अरुण डोंगळे, बाबासाहेब चौगले यांच्यासह संचालक, अधिकारी, महिला स्वयंसेविका आणि कर्मचारी उपस्थित होते.


गोकुळमध्ये सहकार सप्ताहानिमित्त ध्वजारोहण; नविद मुश्रीफ यांचे मार्गदर्शन
Total Views: 27