बातम्या

बाजारभोगावमध्ये पुराचे पाणी; दुकानदारांची धावपळ

Flood water in Bazar Bhogao


By nisha patil - 8/20/2025 11:31:36 AM
Share This News:



बाजारभोगावमध्ये पुराचे पाणी; दुकानदारांची धावपळ

प्रतिनिधी : शहाबाज मुजावर बाजार भोगाव येथील गळ्यातील दुकानांच्या बेसमेंटमध्ये पुराचे पाणी शिरले असून आता पाणी रस्त्यावर येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे दुकानदारांनी आपले साहित्य सुरक्षित स्थळी हलविण्याची धावपळ सुरू केली आहे.

दरम्यान, त्लोकवस्तीत अद्याप कोणताही धोका नसला तरी खबरदारीचा उपाय म्हणून तेथील नागरिकांना पुराच्या पाण्याचा अंदाज घेऊन प्रशासनामार्फत निवारा गृहात स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 


बाजारभोगावमध्ये पुराचे पाणी; दुकानदारांची धावपळ
Total Views: 83