बातम्या
वाहतुकीच्या नियमांचे पालन करा आणि अपघात टाळा -विजय मोरे
By nisha patil - 11/27/2025 4:35:06 PM
Share This News:
आजरा(हसन तकीलदार):- सद्या साखर कारखान्यांच्या ऊसाच्या गाळप हंगामाची धूमधाम सुरु आहे. रस्त्यावरील वाहतुकीची वर्दळ वाढल्याने तसेच लगेचच वर्षाअखेर असल्याने गोव्याकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्याचअनुषंगाने वसंतराव देसाई आजरा शेतकरी सह. साखर कारखान्यावर मोटर वाहन निरीक्षक विजय मोरे यांनी भेट देऊन वाहन चालकांना नियमावली सांगितली व रिफ्लेक्टर वाटप केले.
स्वागत कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. के. सावंत यांनी केले. तर प्रास्ताविक मुख्यशेतीअधिकारी विक्रमसिंह देसाई यांनी केले. यावेळी वाहन निरीक्षक विजय मोरे यांनी वाहनांना रिफ्लेक्टर किंवा रेडियम लावणेबाबत सूचना दिल्या त्याचप्रमाणे सद्या 31 डिसेंबरची धूम सुरु होणार असलेने ट्रॅक्टर ट्रकना आरसे बसवून घेणेबाबत, कर्णकर्कश आवाज करून गाणी लावू नका, वाहन सुरक्षित ठेवा, एका बाजूने वाहने चालवा जेणेकरून पुढे जाणाऱ्या वाहनांना अडचण होणार नाही.
वाहने सुस्थितीत ठेवा त्याचप्रमाणे वाहन चालवताना मद्यप्राशन करू नका असे सांगितले. जर मद्यप्राशन करून वाहन चालवताना आढळलेस त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणेत येईल असेही त्यांनी सांगितले. यावेळी स्नेहा देसाई (सहाय्य्क मोटार वाहन निरीक्षक)यांनीही मद्यप्राशन करून ट्रॅक्टर चालवल्यामुळे गेल्या आठवड्यात कोल्हापुरात एक अपघात झाल्याची जाणीव करून दिली. एका अपघाताने अनेक कुटुंबे उध्वस्त होतात असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे चालक परवाना, विमा कागदपत्रे तसेच वाहनांची कागदपत्रे पूर्ण असावीत अशीही सूचना दिली. यावेळी रिफ्लेक्टर आणि रेडियमचेही वाटप करण्यात आले. शेवटी ऊसपुरवठा अधिकारी अजित(राजू )देसाई यांनी आभार मानले. यावेळी वाहन निरीक्षक विभागचे प्रकाश पाटील, सचिन पाटील, कारखान्याचे कार्यलयीन अधीक्षक अनिल देसाई, शेती विभागचे मुख्य लिपिक संदीप कांबळे, केनयार्ड सुपरवायझर तुकाराम मोळे, तसेच ट्रक ट्रॅक्टर चालक उपस्थित होते.
वाहतुकीच्या नियमांचे पालन करा आणि अपघात टाळा -विजय मोरे
|