शैक्षणिक
Urdu Vidya Mandir Aurwad येथे फूड फेस्टिव्हल व आठवडी बाजार उत्साहात
By Administrator - 2/23/2026 12:01:50 PM
Share This News:
Urdu Vidya Mandir Aurwad येथे फूड फेस्टिव्हल व आठवडी बाजार उत्साहात
विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव
सरपंचांच्या हस्ते उद्घाटन; पालकांचा उत्स्फूर्त सहभाग
औरवाड (ता. शिरोळ) दि. 16/02/2026 रोजी उर्दू विद्या मंदिर औरवाड येथे इयत्ता 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी फूड फेस्टिव्हल व आठवडी बाजार या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना दैनंदिन व्यवहाराचे ज्ञान मिळावे तसेच खरेदी-विक्रीचा प्रत्यक्ष अनुभव यावा या उद्देशाने हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावून खरेदी-विक्री व्यवहार केले. पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या पुढाकाराने कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी योग्य व उत्तम नियोजन केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन गावचे नूतन सरपंच Shafi Ali Murtaza Patel व माजी सरपंच Ashraf Ali Ismail Patel यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचा आढावा शिरोळ तालुका प्रतिनिधी अतिक पटेल यांनी घेतला.
Urdu Vidya Mandir Aurwad येथे फूड फेस्टिव्हल व आठवडी बाजार उत्साहात
|