बातम्या
दाजीपूरच्या जंगल सफारीत पहिल्यांदाच महिला गाईड; साची गवळींचा ऐतिहासिक ठसा!
By nisha patil - 11/17/2026 3:41:20 PM
Share This News:
दाजीपूरच्या जंगल सफारीत पहिल्यांदाच महिला गाईड; साची गवळींचा ऐतिहासिक ठसा!
राधानगरी तालुक्यातील निसर्गसमृद्ध दाजीपूर अभयारण्यात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर अभयारण्याच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला जात आहे. कारण, आता दाजीपूरच्या जंगल सफारीत पर्यटकांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी एका महिलेने यशस्वीपणे स्वीकारली आहे. साची सचिन गवळी या दाजीपूर अभयारण्यातील पहिल्या महिला गाईड ठरल्या आहेत. आपल्या ओघवत्या वाणीने त्या पर्यटकांना जंगलातील झाडे-झुडपे, विविध पक्षी, पाने, फुले आणि निसर्गातील जैवविविधतेची रंजक माहिती देत आहेत.
आजवर पुरुषांचे वर्चस्व असलेल्या या क्षेत्रात साची गवळी यांनी आत्मविश्वासाने पाऊल टाकत महिलांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे पर्यटन क्षेत्रात महिलांसाठीही नव्या संधी निर्माण होण्याचा मार्ग खुला झाला आहे. दाजीपूरच्या जंगलात पर्यटकांना निसर्गाची ओळख करून देणाऱ्या साची गवळी यांचे हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांच्या या यशातून प्रेरणा घेऊन भविष्यात अधिकाधिक महिला या क्षेत्रात पुढे येतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दाजीपूरच्या जंगल सफारीत पहिल्यांदाच महिला गाईड; साची गवळींचा ऐतिहासिक ठसा!
|