बातम्या
महाराष्ट्रात पहिल्यांदाच! 3D, 4K रोबोटिक एक्सोस्कोप कोल्हापुरात
By nisha patil - 5/8/2025 5:42:43 PM
Share This News:
महाराष्ट्रात पहिल्यांदाच! 3D, 4K रोबोटिक एक्सोस्कोप कोल्हापुरात
कोल्हापूर, नागाळा पार्क येथील विन्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील अत्याधुनिक सहा मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्सचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जर्मनीतून आयात करण्यात आलेल्या 3D, 4K VITOM STORZ EXOSCOPE या अत्याधुनिक रोबोटिक प्रणालीचेही लोकार्पण झाले. ही प्रणाली महाराष्ट्रात प्रथमच येथे कार्यान्वित करण्यात आली असून, मेंदू, मणका, प्लास्टिक सर्जरी, ईएनटी आणि ऑन्को सर्जरीसारख्या क्लिष्ट शस्त्रक्रिया आता AI तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अधिक सुलभ आणि अचूक होणार आहेत.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले की, "शस्त्रक्रिया तंत्रज्ञानात ही एक मोठी झेप असून, कोल्हापूरसारख्या जिल्ह्यात या दर्जाचे वैद्यकीय तंत्रज्ञान उपलब्ध होणे, ही अभिमानाची गोष्ट आहे."
या उद्घाटनप्रसंगी विख्यात न्यूरोसर्जन डॉ. संतोष प्रभू, डॉ. सुजाता प्रभू, डॉ. आकाश प्रभू यांच्यासह हॉस्पिटलचे डॉक्टर व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्रात पहिल्यांदाच! 3D, 4K रोबोटिक एक्सोस्कोप कोल्हापुरात
|