विशेष बातम्या
शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला प्र-कुलगुरू — डॉ. ज्योती जाधव यांची नियुक्ती!
By nisha patil - 10/31/2025 4:49:09 PM
Share This News:
शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला प्र-कुलगुरू — डॉ. ज्योती जाधव यांची नियुक्ती!
शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरूपदी विद्यापीठातील जैवतंत्रज्ञान विभागाच्या प्रमुख डॉ. ज्योती जाधव यांची गुरुवारी नियुक्ती करण्यात आली. प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी विशेष अधिकारांचा वापर करून ही नियुक्ती केली आहे.
विद्यापीठाच्या ६३ वर्षांच्या इतिहासात प्र-कुलगुरूपदी महिलेस प्रथमच संधी मिळाली असून, डॉ. जाधव यांचा कार्यकाळ नियमित कुलगुरूची नियुक्ती होईपर्यंत असणार आहे. जागतिक स्तरावर आघाडीच्या दोन टक्के संशोधकांमध्ये समावेश असलेल्या डॉ. जाधव यांनी अधिष्ठाता ते प्र-कुलगुरू असा उल्लेखनीय प्रवास केला आहे.
या पदासाठी डॉ. आर. व्ही. गुरव, डॉ. व्ही. एम. पाटील आणि डॉ. बी. जी. कणसे यांचीही नावे विचारात होती; मात्र व्यवस्थापन परिषदेने एकमताने डॉ. जाधव यांच्या नावाला संमती दिली.
शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला प्र-कुलगुरू — डॉ. ज्योती जाधव यांची नियुक्ती!
|