बातम्या
राधानगरीत रानडुकराच्या मांस विक्रीवर वनविभागाची कारवाई; आरोपी ताब्यात
By nisha patil - 4/3/2026 12:00:50 PM
Share This News:
राधानगरीत रानडुकराच्या मांस विक्रीवर वनविभागाची कारवाई; आरोपी ताब्यात
वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा दाखल; मांस व साहित्य जप्त
राधानगरी तालुक्यातील नवलाईवाडी परिसरात रानडुकराच्या (Wild Boar / Sus scrofa) मांसाची बेकायदेशीर विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर छापेमारी करून संबंधित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
वनपरिक्षेत्र पहाळा व करवीर विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई करत रामदुकर सांगवी या संशयिताकडून सुमारे दोन किलो रानडुकराचे मांस जप्त केले. यावेळी मांस विक्रीसाठी वापरण्यात येणारे साहित्य तसेच दोन दुचाकी वाहनेही जप्त करण्यात आली.
या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 च्या कलम 2(16), 9, 39, 50, 51 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई उपवनसंरक्षक, कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्र.) करवीर, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्र.) पहाळा तसेच वनरक्षक व वनपालांच्या पथकाने संयुक्तपणे केली.
वनविभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, वन्यप्राण्यांची शिकार किंवा त्यासंबंधित कोणतीही बेकायदेशीर कृती आढळल्यास तत्काळ प्रशासनाला माहिती द्यावी.
राधानगरीत रानडुकराच्या मांस विक्रीवर वनविभागाची कारवाई; आरोपी ताब्यात
|