बातम्या
दिवाळीचा आनंद सोडून प्रवाशांच्या सेवेत! कोडोलीत एसटीच्या सारथींचा अनोखा सन्मान!
By nisha patil - 9/11/2026 7:48:04 PM
Share This News:
दिवाळीचा आनंद सोडून प्रवाशांच्या सेवेत! कोडोलीत एसटीच्या सारथींचा अनोखा सन्मान!
दिवाळीचा सण म्हंटलं की, घराघरांत आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण... मात्र याच सणाच्या काळात स्वतःचा आनंद बाजूला ठेवून हजारो प्रवाशांना त्यांच्या घरापर्यंत सुखरूप पोहोचवणारे एसटीचे चालक आणि वाहक खऱ्या अर्थाने कौतुकाचे धनी ठरले आहेत. प्रवाशांच्या सेवेसाठी अहोरात्र तत्पर असणाऱ्या या एसटी सारथींच्या सेवाभावाला सलाम करण्यासाठी कोडोली बसस्थानकात आगळावेगळा कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला.
दिवाळीच्या निमित्ताने कोडोली बसस्थानकात मुक्कामाला असणाऱ्या एसटीच्या चालक आणि वाहकांना मिठाई देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच त्यांना दिवाळीच्या शुभेच्छाही देण्यात आल्या. प्रसिद्ध स्टॅम्प व्हेंडर उत्तम कापरे, यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद गोडबोले आणि एसटी महामंडळाचे सेवानिवृत्त लेखा अधिकारी सुरेश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडला.
स्वतःचा सण बाजूला ठेवून प्रवाशांच्या सेवेला प्राधान्य देणारे एसटी कर्मचारी हेच समाजाचे खरे हिरो आहेत, अशा भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केल्या.दरम्यान, दिवाळीनिमित्त कोडोली बसस्थानकात आकर्षक विद्युत रोषणाई, सजावट आणि भक्तिगीतांच्या माध्यमातून उत्साहपूर्ण वातावरण निर्माण करण्यात आले होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके नियोजन बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक उमेश सर्जेराव शिंदे यांनी केले.
दिवाळीचा आनंद सोडून प्रवाशांच्या सेवेत! कोडोलीत एसटीच्या सारथींचा अनोखा सन्मान!
|