ताज्या बातम्या

माजी चेअरमन किशोर कदम यांचे दुःखद निधन

Former Chairman Kishore Kadam passes away


By nisha patil - 7/8/2025 3:33:46 PM
Share This News:



माजी चेअरमन किशोर कदम यांचे दुःखद निधन

यशवंत बिल्डिंग बी व सी को-ऑप. हौसिंग सोसायटीचे माजी चेअरमन किशोर कदम यांचे दुःखद निधन

मुंबई | दि. 06 ऑगस्ट 2025 यशवंत बिल्डिंग बी व सी को-ऑप. हौसिंग सोसायटीचे माजी चेअरमन व सर्वांच्या मनावर हसऱ्या स्वभावाने राज्य करणारे किशोर कदम सर यांचे बुधवारी हृदयविकाराच्या झटक्याने मुंबई येथे अचानक निधन झाले.

किशोर कदम हे केवळ सोसायटीतील पदाधिकारी नव्हते, तर एक सर्वांशी आपुलकीने वागणारे, मदतीस नेहमी तत्पर असणारे आणि “सोसायटी म्हणजे आपलं एकत्र कुटुंब” ही भावना मनापासून जपणारे व्यक्तिमत्व होते.

२०११ पासून अनेकांची त्यांच्याशी मैत्री जोडली गेली. सुरुवातीच्या काळातील कित्येक गोड आठवणींमध्ये – एकत्र जेवणं, सोसायटीचे कार्यक्रम, अडचणींवर उपाययोजना – या प्रत्येक क्षणात त्यांचा हसरा चेहरा आठवतो.

“करू या”, “मी आहे ना!”, “कसला प्रॉब्लेम?” असे सकारात्मक विचार नेहमी ओठांवर. सोसायटीमध्ये समरसून काम करणारा, प्रत्येक समस्येला सामोरे जाणारा एक आधारस्तंभ आज हरपला आहे.

त्यांच्या जाण्याने जावडेकर रेसिडेन्सी व वागळे मळा परिसरातील रहिवाशांमध्ये शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

कदम सरांचं अचानक जाणं ही एक भरून न निघणारी पोकळी आहे. त्यांचं निर्मळ हास्य, मदतीचा हात आणि सगळ्यांशी असलेली आत्मीयता यांची आठवण सतत राहील.

त्यांच्या कुटुंबीयांप्रती तारा न्यूज परिवाराची संवेदना.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच प्रार्थना.

💐 भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏


माजी चेअरमन किशोर कदम यांचे दुःखद निधन
Total Views: 301