बातम्या
गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन नवीद मुश्रीफसाहेब यांनी बजावला मतदानाचा हक्क
By nisha patil - 10/18/2026 11:56:31 AM
Share This News:
गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन नवीद मुश्रीफसाहेब यांनी बजावला मतदानाचा हक्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाच्या (गोकुळ) पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन मा. श्री. नवीद मुश्रीफसाहेब यांनी कागल येथील जवाहर नवोदय विद्यालयातील मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
गोकुळ दूध संघाच्या या पंचवार्षिक निवडणुकीकडे जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष लागले असून, या निवडणुकीच्या माध्यमातून दूध उत्पादकांच्या हितासाठी सक्षम नेतृत्व निवडण्याची महत्त्वपूर्ण प्रक्रिया पार पडत आहे.
नवीद मुश्रीफसाहेब यांनी मतदान करून लोकशाही प्रक्रियेतील आपला सहभाग नोंदवला.
गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन नवीद मुश्रीफसाहेब यांनी बजावला मतदानाचा हक्क
|