बातम्या
काँग्रेसचे माजी नगरसेवक अशोक जाधव यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
By nisha patil - 12/29/2025 3:52:35 PM
Share This News:
काँग्रेसचे माजी नगरसेवक अशोक जाधव यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ, अभ्यासू आणि माजी नगरसेवक अशोक जाधव यांनी आज अधिकृतरित्या शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर यांनी त्यांचे शिवसेनेत स्वागत करून पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अशोक जाधव यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेच्या स्थानिक संघटनेला बळकटी मिळणार असून, त्यांच्या अनुभवाचा पक्षवाढीस निश्चितच फायदा होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या प्रवेशप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर, अभिजीत जाधव, कपिल पोवार, कपिल केसरकर, प्रभु गायकवाड यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काँग्रेसचे माजी नगरसेवक अशोक जाधव यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
|