बातम्या
जिल्हा परिषदेचे माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव निलंबित
By nisha patil - 10/16/2025 4:41:50 PM
Share This News:
जिल्हा परिषदेचे माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव निलंबित
पालकमंत्री आबिटकरांच्या नाराजीनंतर कारवाई
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांना ग्रामविकास विभागाने मंगळवारी निलंबित केले. जिल्हा नियोजन निधीतील विविध योजनांमध्ये अनियमितता, सीलबंद कपाटे उघडून पुराव्यांमध्ये छेडछाड आणि नस्त्या जमा न करण्याचे प्रकार उघड झाल्याने ही कारवाई करण्यात आली. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी त्यांच्या कामकाजाबाबत व्यक्त केलेल्या नाराजीनंतर चौकशी सुरू झाली होती.
जिल्हा परिषदेचे माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव निलंबित
|