राजकीय

कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री डॉ. सी.एन. अश्वथ नारायण यांचे अंबाबाई दर्शन

Former Deputy Chief Minister of Karnataka


By nisha patil - 12/13/2025 1:45:24 PM
Share This News:



कोल्हापूर : कर्नाटक भाजपचे प्रमुख नेते, माजी उपमुख्यमंत्री तथा बेंगळूर शहराचे आमदार मा. डॉ. सी.एन. अश्वथ नारायण यांनी आज महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री अंबाबाई मंदिरात दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.

यानंतर आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर येथील हॉटेल दर्शन ग्रॅण्ड येथे त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली तसेच निवडणूक तयारीबाबत मार्गदर्शन केले. संघटन मजबूत करून जनतेशी थेट संपर्क वाढवण्यावर त्यांनी भर दिला.

यावेळी प्रभाग क्रमांक १२ चे उमेदवार अश्किन आजरेकर, तसेच निलेश भोसले, सिद्धेश गवळी, शाकीर शेख, संग्राम कोतमिरे यांच्यासह भाजपचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री डॉ. सी.एन. अश्वथ नारायण यांचे अंबाबाई दर्शन
Total Views: 55