बातम्या
गोकुळचे माजी संचालक प्रकाश पाटील नेर्लीकर यांना काँग्रेस प्रणित राजश्री शाहू शेतकरी समविचारी आघाडीकडून डावलले; कार्यकर्त्यांमध्ये नाराजी
By nisha patil - 8/10/2026 11:37:43 PM
Share This News:
गोकुळचे माजी संचालक प्रकाश पाटील नेर्लीकर यांना काँग्रेस प्रणित राजश्री शाहू शेतकरी समविचारी आघाडीकडून डावलले; कार्यकर्त्यांमध्ये नाराजी
कागल प्रतिनिधी अजित बोडके कणेरी - गोकुळ दूध संघाचे माजी संचालक प्रकाश पाटील नेर्लीकर यांना काँग्रेस प्रणित राजश्री शाहू शेतकरी समविचारी आघाडी* कडून तिकीट नाकारण्यात आल्याने आघाडीच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.
गेली पाच वर्षे गोकुळमध्ये काम करण्याची संधी मिळालेल्या प्रकाश पाटील यांनी महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्याची जबाबदारी अत्यंत समाधानकारकपणे सांभाळली. शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीचे राज्य समन्वयक म्हणून त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी राज्यभर लढा दिला.
लोकसभा, विधानसभा, विधानपरिषद, केडीसीसी, बाजार समिती, बिद्री साखर कारखाना, राजाराम कारखाना - प्रत्येक निवडणुकीत आघाडीने दिलेली जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी "एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह" - पशुवैद्यकीय सेवा असो वा पशुखाद्याचा प्रश्न, ते तत्पर असतात.
कुस्ती, बैलगाडी शर्यत, शरीरसौष्ठव स्पर्धेला प्रोत्साहन देणारा हा जिवाभावाचा कार्यकर्ता डावलला गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना तिकीट मिळणे अपेक्षित होते, मात्र ऐनवेळी त्यांना नाकारण्यात आले. त्यामुळे अशा प्रामाणिक आणि कार्यतत्पर कार्यकर्त्याचे राजकीय पुनर्वसन होणे गरजेचे आहे, अशी मागणी आता शेतकरी आणि दूध उत्पादकांमधून होत आहे.
गोकुळचे माजी संचालक प्रकाश पाटील नेर्लीकर यांना काँग्रेस प्रणित राजश्री शाहू शेतकरी समविचारी आघाडीकडून डावलले; कार्यकर्त्यांमध्ये नाराजी
|