बातम्या
वारणानगरमध्ये माजी आमदार महाडिक व आमदार डॉ. विनय कोरे यांची भेट; विविध विकासकामांवर चर्चा
By nisha patil - 4/18/2025 4:30:04 PM
Share This News:
वारणानगरमध्ये माजी आमदार महाडिक व आमदार डॉ. विनय कोरे यांची भेट; विविध विकासकामांवर चर्चा
वारणानगर (जनसंपर्क कार्यालय) : कोल्हापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार महादेवराव महाडिक (आप्पा) यांनी आज वारणानगर येथे आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत त्यांनी विविध सामाजिक, शैक्षणिक आणि विकासकामांबाबत सखोल चर्चा केली.
या बैठकीदरम्यान श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन दिलीपराव पाटील, वडगांव शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेश पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
या चर्चेमुळे भविष्यातील विकास योजनांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दोन्ही नेत्यांमधील ही सौहार्दपूर्ण भेट राजकीय व सामाजिक पातळीवर महत्वाची ठरली आहे.
वारणानगरमध्ये माजी आमदार महाडिक व आमदार डॉ. विनय कोरे यांची भेट; विविध विकासकामांवर चर्चा
|