बातम्या

जन्म-मृत्युचे दाखले वितरणात दक्षता बाळगा माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या सूचना

Former MP Kirit Somaiya issues instructions


By Administrator - 7/7/2026 1:44:48 PM
Share This News:



जन्म-मृत्युचे दाखले वितरणात दक्षता बाळगा माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या सूचना

कोल्हापूर, ता.06 : कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत नागरिकांना वितरित करण्यात येणाऱ्या जुन्या पद्धतीतील जन्म-मृत्यू दाखल्यांचे वितरण अत्यंत दक्षता आणि पारदर्शकतेने करण्यात यावे अशा सूचना माजी खासदार किरिट सोमय्या यांनी आज दिल्या. माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज सायंकाळी कोल्हापूर महानगरपालिकेला सदिच्छा भेट देऊन जन्म व मृत्यू नोंदणी विभागाच्या कामकाजाचा स्थायी समिती सभागृहात आढावा घेतला. प्रारंभी महापौर सौ. रुपाराणी निकम यांनी त्यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

            यावेळी माजी खासदार किरिट सोमय्या यांनी जन्म-मृत्यू दाखल्यांच्या वितरणाबाबत सविस्तर माहिती घेतली. सीआरएस (Civil Registration System) प्रणाली लागू झाल्यानंतर जुन्या नोंदींवरील दाखले कोणत्या पद्धतीने दिले जातात जुन्या अर्जांची प्रक्रिया कशी केली जाते. तसेच १ सप्टेंबर २०२५ पासून सुरू झालेल्या सीआरएस प्रणालीअंतर्गत जुन्या दाखल्यांचाही समावेश करण्यात आला आहे का याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. जुन्या पद्धतीने दाखले वितरित करताना गैरव्यवहार होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने अशा दाखल्यांचे वितरण करताना सर्वतोपरी दक्षता घेण्यात यावी. तसेच संबंधित विभागातील संपूर्ण यंत्रणा सतर्क ठेवून प्रत्येक प्रकरणाची पडताळणी करूनच दाखले वितरित करावेत अशा सूचना त्यांनी दिल्या.

            महापौर सौ. रुपाराणी निकम यांनी यावेळी सांगितले की माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलेल्या सूचनांच्या अनुषंगाने मंगळवारी जन्म व मृत्यू नोंदणी विभागाकडून सविस्तर माहिती घेऊन विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला जाईल. आवश्यक त्या सुधारणा व उपाययोजनांबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली.

            यावेळी स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, सभागृह नेता मुरलीधर जाधव, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उप-आयुक्त किरणकुमार धनवाडे, नगरसेवक विजय जाधव, अभिजीत खतकर, विजयसिंह खाडे-पाटील, जन्म मृत्यू निबंधक डॉ.मनीषा चव्हाण, सहा.सांख्यिकी अधिकारी संजय कुंभार उपस्थित होते.


जन्म-मृत्युचे दाखले वितरणात दक्षता बाळगा माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या सूचना
Total Views: 14