राजकीय
सर्वांच्या सहकार्याने कोल्हापूरात होणारे मंडपम एक्झिबिशन यशस्वी करूया - माजी महापौर सागर चव्हाण.
By nisha patil - 12/17/2025 4:11:54 PM
Share This News:
सर्वांच्या सहकार्याने कोल्हापूरात होणारे मंडपम एक्झिबिशन यशस्वी करूया - माजी महापौर सागर चव्हाण.
प्रतिनिधी - स्वप्निल गोरमकर आपल्या व्यवसायात एकत्र आले पाहिजे . व्यावसायिकांनी प्रवाहात राहण्याची गरज आहे . व्यवसायात लहान मोठ्या मानण्याची गरज नाही .
व्यवसायात स्पर्धा असलीच पाहिजे.
तसेच व्यवसायावर प्रेम करण्याबरोबरच कामाशी प्रामाणिक राहिले पाहिजे .असे प्रतिपादन माजी महापौर,ऑल टेन्ट डीलर्स वेल्फेअर ऑर्गनायझेशनचे चेअरमन , कोल्हापूर जिल्हा मंडप लायटिंग डेकोरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष
सागर चव्हाण ( कोल्हापूर ) यांनी केले.
येथील श्रीराम मंगल कार्यालयात झालेल्या कोल्हापूर जिल्हा मंडप,लायटिंग , डेकोरेटर्स असोसिएशन अंतर्गत कागल तालुका मंडप, लायटिंग , डेकोरेटर्स ,आचारी ,हॉल संघटनेच्या तालुका बैठकीत ते बोलत होते .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येथील श्रीराम मंगल कार्यालयाचे मालक रामचंद्र भुते होते.
सागर चव्हाण म्हणाले, जिल्हा संघटनेच्या माध्यमातून व्यवसाय वाढीला हातभार लावला जात आहे .संघटनेच्या माध्यमातून छोट्यातला छोटा व्यावसायिक सुद्धा सक्षम झाला पाहिजे यासाठी संघटना प्रयत्नशील आहे .
तसेच डिजीटल युगात आपण व्यवसाय करीत असताना व्यावसायिकांनी आपल्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे .
यावेळी सागर लोंढे ,प्रशांत भुते , धनाजी शिंदे ,सुनील लोहार ,दीपक मगर ,अनिल पाटील रणजीत निकम यांनी मनोगतातून व्यवसायातील चढ उतारा बाबतची सविस्तर माहिती दिली.
यावेळी मुन्नाभाई शेख ,सुनील व्हनागडे, निलेश जामदार, नियाज पटवेगार, शामराव कदम, कोल्हापूर शहर सेक्रेटरी दीपक भोसले , सागर पाटील ,राधानगरी तालुका अध्यक्ष विकास कवडे,सुखदेव पाटील पोपट वाडकर,विठ्ठल भुते , महादेव पाटील,अक्षय चव्हाण , मनोहर पाटील, कृष्णात भुते यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते .यावेळी सागर लोंढे यांनी स्वागत, प्रास्ताविक केले . सुत्र संचालन एम बी टिपुगडे व विनायक सातुशे यांनी केले .
तर आभार धनाजी जिरगे यांनी मानले .
सर्वांच्या सहकार्याने कोल्हापूरात होणारे मंडपम एक्झिबिशन यशस्वी करूया - माजी महापौर सागर चव्हाण.
|