बातम्या
काँग्रेसच्या निर्धार मेळाव्यास माजी नगरसेवकांचा पाठिंबा
By nisha patil - 7/26/2025 2:52:01 PM
Share This News:
काँग्रेसच्या निर्धार मेळाव्यास माजी नगरसेवकांचा पाठिंबा
महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा निर्धार मेळावा शनिवारी, 26 जुलै रोजी होणार असून, तो यशस्वी करण्यासाठी माजी नगरसेवकांची बैठक अजिंक्यतारा कार्यालयात पार पडली.
या बैठकीस माजी उपमहापौर संजय मोहिते, मधुकर रामाणे, भूपाल शेटे, इंद्रजीत बोंद्रे, संदीप नेजदार, दुर्वास कदम, प्रताप जाधव, अर्जुन माने, तौफीक मुल्लाणी, विनायक फाळके, सुजय पोतदार, शिवानंद बनछोडे आदी माजी नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.
मेळाव्यात खासदार शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील, जयंत आसगावकर, मालोजीराजे छत्रपती व ऋतुराज पाटील मार्गदर्शन करणार आहेत.
काँग्रेसच्या निर्धार मेळाव्यास माजी नगरसेवकांचा पाठिंबा
|