ताज्या बातम्या

ऊस वाहतुकीमुळे चार निष्पाप नागरिकांचे बळी; नियमांची अंमलबजावणी कुठे?

Four innocent citizens killed due to sugarcane


By nisha patil - 11/15/2025 12:24:24 PM
Share This News:



कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस गाळप हंगामात ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे पुन्हा जीवितहानीची मालिका सुरूच असून, आतापर्यंत निष्पाप चार नागरिकांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते निलेश रंजन बनसोडे यांनी केला आहे.
कोल्हापूर पोलिस अधिक्षकांच्या आदेशानुसार ३ नोव्हेंबर २०२५ पासून रात्री १० ते पहाटे ६ या वेळेत ऊस वाहतूक पर्यायी मार्गांवर वळविण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, या आदेशाची अंमलबजावणी शहर वाहतूक शाखेकडून होत नाही, वाहतूक पोलिसांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा गंभीर आरोप बनसोडे यांनी केला.

बनसोडे म्हणाले, अनेक वाहनांना रिफ्लेक्टर नाहीत, काही चालकांकडे लायसन्स नाही, तर काही दारूच्या नशेत वाहन चालवतात, आणि यावर कारवाई होत नसल्याने नागरिकांचे जीव धोक्यात येत आहेत. ऊस उत्पादकांसाठी न्याय मागणाऱ्या नेत्यांनी निष्पाप नागरिकांच्या सुरक्षेकडेही लक्ष द्यावे, अशी त्यांनी मागणी केली.

शहर वाहतूक पोलीस निरीक्षक आणि पोलिस अधिक्षकांना त्यांनी आवाहन केले की, नियमांची अंमलबजावणी करणार नसाल तर प्रेस नोट काढू नका, आणि जाहीर केलेले नियम काटेकोरपणे पाळले जातील याची जबाबदारी घेण्याचे आवाहन करण्यात आला आहे.


ऊस वाहतुकीमुळे चार निष्पाप नागरिकांचे बळी; नियमांची अंमलबजावणी कुठे?
Total Views: 46