विशेष बातम्या

कोल्हापूर सर्किट बेंचसाठी चार न्यायमूर्ती नियुक्त; 18 ऑगस्टपासून कामकाज सुरू

Four judges appointed for Kolhapur Circuit Bench


By nisha patil - 8/15/2025 5:50:17 PM
Share This News:



कोल्हापूर सर्किट बेंचसाठी चार न्यायमूर्ती नियुक्त; 18 ऑगस्टपासून कामकाज सुरू

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचसाठी गुरुवारी चार न्यायमूर्तींची नियुक्ती झाली आहे. रजिस्ट्रार एच. एम. भोसले यांनी यासंदर्भातील आदेश काढले.

न्या. एम. एस. कर्णिक आणि न्या. शर्मिला देशमुख यांची डिव्हिजन बेंचमध्ये, तर न्या. शिवकुमार दिघे आणि न्या. एस. जी. चपळगावकर यांची सिंगल बेंचमध्ये नियुक्ती झाली आहे. सर्किट बेंचचे नियमित कामकाज 18 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.

न्या. कर्णिक व न्या. देशमुख यांच्याकडे जनहित याचिका, दिवाणी व फौजदारी प्रकरणे, अपील, अवमान याचिका, कर कायदे, पॅरोल याचिका आदी कामकाज असेल. न्या. दिघे यांच्याकडे फौजदारी अपील, जामीन अर्ज, प्रथम अपील व किरकोळ दिवाणी अर्ज तर न्या. चपळगावकर यांच्याकडे दिवाणी रिट, दुसरे अपील, पुनर्विचार अर्ज व आदेशावरील अपीलची जबाबदारी असेल.


कोल्हापूर सर्किट बेंचसाठी चार न्यायमूर्ती नियुक्त; 18 ऑगस्टपासून कामकाज सुरू
Total Views: 72