बातम्या

 चार वर्षांच्या सियाचं धाडस! स्वतःचा हात भाजून मैत्रिणीचा जीव वाचवला!

Four year old Sia s courage


By nisha patil - 11/23/2026 11:05:07 PM
Share This News:



 चार वर्षांच्या सियाचं धाडस! स्वतःचा हात भाजून मैत्रिणीचा जीव वाचवला!
 

मैत्रिणीसाठी स्वतःच्या वेदना विसरली! चार वर्षांच्या सियाचं धाडस कौतुकास्पद!
कोल्हापूर : संकटाच्या क्षणी वय नाही, तर धाडस महत्त्वाचं असतं, याचा प्रत्यय चंबुखडी येथे आला. अवघ्या चार वर्षांच्या सिया रितेश तेजवानी हिने स्वतःचा हात भाजण्याची पर्वा न करता मैत्रीण सावी महेंद्रकर हिचा जीव वाचवला. तिच्या या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

२१ नोव्हेंबर रोजी तुळशी विवाहाच्या उत्सवात अंगणातील पणतीमुळे चार वर्षीय सावीच्या ड्रेसने अचानक पेट घेतला. मैत्रिणीच्या अंगावरील आग पाहताच सियाने क्षणाचाही विलंब न करता स्वतःच्या हातांनी आग विझवली. या प्रयत्नात सियाचा हात भाजला; मात्र तिच्या धाडसामुळे सावी मोठ्या संकटातून बचावली.
 

स्वतःच्या वेदनांपेक्षा मैत्रिणीचा जीव महत्त्वाचा मानणाऱ्या या चिमुकलीने मैत्रीचा खरा अर्थ कृतीतून दाखवून दिला. अवघ्या चार वर्षांच्या सियाने दाखवलेले धैर्य, प्रसंगावधान आणि निरागस मैत्री खरोखरच कौतुकास्पद आहे. सियाच्या या धाडसाला सलाम!


 चार वर्षांच्या सियाचं धाडस! स्वतःचा हात भाजून मैत्रिणीचा जीव वाचवला!
Total Views: 4