बातम्या

८३ लाखांची बँक फसवणूक: सराफ दीपक देवरूखकरसह ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Fraud exposed in Kolhapurs


By nisha patil - 10/11/2025 12:20:24 PM
Share This News:



 

कोल्हापूर: करूर वैश्य बँकेच्या कोल्हापूरमधील राजारामपुरी शाखेत बनावट सोने तारण ठेवून ८३ लाख ३६ हजार रुपयांची मोठी फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी बँकेने दिलेल्या तक्रारीनुसार, राजारामपुरी पोलिसांनी बँकेच्या पॅनेलवरील अधिकृत सराफ दीपक गोपाळ देवरूखकर याच्यासह एकूण सात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आरोपींनी संगनमत करून सोन्याऐवजी अत्यंत हुबेहूब दिसणारे बनावट दागिने बँकेत गोल्ड लोनसाठी तारण ठेवले आणि या दागिन्यांना सराफ देवरूखकर याने खरे असल्याचे खोटे प्रमाणपत्र दिले. या बनावट प्रमाणपत्राच्या आधारावर बँकेकडून कर्ज घेऊन त्यांनी बँकेला मोठा आर्थिक गंडा घातला. कर्जाची परतफेड न झाल्याने बँक व्यवस्थापनाने केलेल्या अंतर्गत तपासणीत हा फसवणुकीचा प्रकार समोर आला. राजारामपुरी पोलीस निरीक्षक विनोद घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा सखोल तपास सुरू असून, या घोटाळ्यात सहभागी असलेल्या अन्य आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.


८३ लाखांची बँक फसवणूक: सराफ दीपक देवरूखकरसह ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Total Views: 53