बातम्या

२८० कोटींची फसवणूक… मग चार्जशीट फक्त १२ कोटींची? हायकोर्टचा तपास अधिकाऱ्यांना जाब!

Fraud of Rs 280 crores


By nisha patil - 8/12/2025 5:33:08 PM
Share This News:



२८० कोटींची फसवणूक… मग चार्जशीट फक्त १२ कोटींची? हायकोर्टचा तपास अधिकाऱ्यांना जाब!

जादा परताव्याचे आमिष दाखवून ग्रोबझ ट्रेडिंग सर्व्हिसेसने २८० कोटींची फसवणूक केली असताना, फक्त १२ कोटींचे चार्जशीट दाखल केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायमूर्ती शिवकुमार दिगे यांनी तपास अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

“नेमका तपास काय केला? किती आरोपी पकडले? किती जणांची प्रॉपर्टी अटॅच केली?” अशा प्रश्नांची सरबत्ती न्यायालयाने केली; मात्र अधिकारी समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. तपासातील ढिलाई आणि अधिकाऱ्यांमधील समन्वयाच्या अभावाबाबत न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली.

परिणामी, तत्कालीन पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांना मंगळवारी (ता. ९) न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. तसेच, आवश्यकता भासल्यास एसआयटी नेमण्याचे संकेतही न्यायमूर्तींनी दिले.

ग्रोबझ फसवणूक प्रकरणातील मुख्य संशयित विश्वास कोळीचा जामीन अर्ज आज सुनावणीस लागला होता. शाहूपुरी पोलिस ठाण्यातील तपासी अधिकारी न्यायालयात उपस्थित होते; पण तपासाबाबत ठोस माहिती न देता ते निरुत्तर झाले.

दरम्यान, ए. एस. ट्रेडर्समधील फसवणूक प्रकरणाचीही सुनावणी होती; मात्र पुढील तारीख देण्यात आली.


२८० कोटींची फसवणूक… मग चार्जशीट फक्त १२ कोटींची? हायकोर्टचा तपास अधिकाऱ्यांना जाब!
Total Views: 15