बातम्या
कोल्हापूरात सोन्या-चांदीसह 37 लाखांची फसवणूक
By nisha patil - 4/10/2025 2:57:50 PM
Share This News:
कोल्हापूरात सोन्या-चांदीसह 37 लाखांची फसवणूक
महिलेला गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचे आमिष; शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
कोल्हापूर : महाडीक वसाहत व भवानी मंडप परिसरात महिलेला गुंतवणुकीवर जादा परतावा मिळेल असे खोटे आमिष दाखवून तब्बल 37 लाख 72 हजार 400 रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सौ. ज्योती कृष्णा पाटील (वय 52, रा. औदुंबर बंगला, महाडीक वसाहत, रुईकर कॉलनी, कोल्हापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी जयश्री मोहन माजगावकर (रा. सुभाषनगर, राजारामपुरी, कोल्हापूर) हिने 2014 ते जून 2015 या काळात फिर्यादी तसेच त्यांच्या बहिणी पल्लवी हांडे आणि मैत्रीण रुपा धोंड यांना गुंतवणुकीवर अधिक नफा मिळेल असे सांगून विश्वास संपादन केला.
त्यानंतर आरोपीने रोख 19 लाख रुपये, 638 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (किंमत सुमारे 17.86 लाख रुपये) आणि 2 किलो चांदी (किंमत सुमारे 86 हजार रुपये) असा एकूण 37.72 लाख रुपयांचा माल घेतला. मात्र, त्यावर कोणताही परतावा न देता आर्थिक फसवणूक केली.
या प्रकरणी भा.दं.वि. कलम 420 अन्वये शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 706/2025 दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विशाल मुळे हे करीत आहेत.
फिर्यादींच्या म्हणण्यानुसार, आरोपीने दीर्घकाळ त्यांचा विश्वास संपादन करून गुंतवणुकीच्या नावाखाली पैसे व सोन्याचांदीचे दागिने घेतले. मात्र, काहीही परत न दिल्याने फसवणुकीचे स्वरूप स्पष्ट झाले.
🔹 दाखल अधिकारी: पोसई अभिजीत पवार
🔹 तपास अधिकारी: सपोनि विशाल मुळे, शाहूपुरी पोलीस ठाणे
तपासानंतर आणखी बळी समोर येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.
कोल्हापूरात सोन्या-चांदीसह 37 लाखांची फसवणूक
|