बातम्या

श्री आनंदराव आबिटकर कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये इंजिनिअरिंग प्रवेशासाठी मोफत सुविधा केंद्र – प्राचार्य डॉ.उमेश पाटील

Free Facilitation Centre for Engineering Admissions at Shri Anandrao Abitkar


By Administrator - 8/7/2026 6:34:03 AM
Share This News:



श्री आनंदराव आबिटकर कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये इंजिनिअरिंग प्रवेशासाठी मोफत सुविधा केंद्र – प्राचार्य डॉ.उमेश पाटील

गारगोटी प्रतिनिधी, युवा ग्रामीण विकास संस्थेच्या श्री आनंदराव आबिटकर कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पाल (गारगोटी), ता.भुदरगड, जि.कोल्हापूर येथे पदवी इंजिनिअरिंग (बी. टेक.) प्रवेशासाठी महाराष्ट्र शासनमान्य 'स्कुटीनी केंद्र' (सुविधा केंद्र) कार्यान्वित करण्यात आले आहे. इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी संस्थेने विशेष नियोजन केले आहे.

या केंद्रात ऑनलाईन अर्ज भरणे, कागदपत्रांचे स्कॅनिंग, पडताळणी, अपलोड करणे आणि अर्ज निश्चिती या सर्व सुविधा विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच, तज्ज्ञ प्राध्यापकांमार्फत कॅप राऊंडची माहिती आणि इंजिनिअरिंगनंतरच्या करिअर व नोकरीच्या संधींविषयी मार्गदर्शन केले जात आहे. प्रवेश प्रक्रियेदरम्यान सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि शासकीय योजनांची सविस्तर माहितीही येथे मिळणार आहे. प्रवेश प्रक्रियेचा वेग लक्षात घेता सुट्टीच्या दिवसांतही म्हणजेच रविवारसह सर्व दिवस हे केंद्र सुरू राहणार आहे. राज्य सीईटी सेलद्वारे आयोजित प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज निश्चितीची मुदत १२ जुलैपर्यंत आहे.

संस्थेचे अध्यक्ष प्रा.अर्जुन आबिटकर, प्राचार्य डॉ.उमेश पाटील यांनी सर्व इच्छुक विद्यार्थी व पालकांना या मोफत सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
 


श्री आनंदराव आबिटकर कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये इंजिनिअरिंग प्रवेशासाठी मोफत सुविधा केंद्र – प्राचार्य डॉ.उमेश पाटील
Total Views: 17