बातम्या
जेष्ठ नागरिकांसाठी मोफत बँक पासबुक वाटपाचा उपक्रम संपन्न
By nisha patil - 9/26/2025 4:34:24 PM
Share This News:
जेष्ठ नागरिकांसाठी मोफत बँक पासबुक वाटपाचा उपक्रम संपन्न
इचलकरंजी, दि. 25 : प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी व आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री दिपक अशोक पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित सामाजिक उपक्रमांतर्गत 203 जेष्ठ नागरिकांना मोफत बँक पासबुक वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम यशवंत हॉल, वर्धमान चौक, इचलकरंजी येथे आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या शुभहस्ते पार पडला.
या सोहळ्यास माजी आमदार सुरेश हाळवणकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली.
कार्यक्रमाला पूर्व मंडल अध्यक्ष श्रीरंग खवरे, पश्चिम मंडल अध्यक्ष शशिकांत मोहिते, तसेच अशोक स्वामी, मिश्रीलाल जाजू, ऋषभ जैन, अनिल डाळ्या, नगरसेविका संध्या बनसोडे, दिपक पाटील, सचिन पवार, इम्रान मकानदार, अभय बाबेल, संतोष कांदेकर, सतीश नायडू आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच सौ. सीमा कमते, बूथ प्रमुख सौ. सुप्रिया संकपाळ, सौ. रेखा आरेकर, सौ. सुरेखा मोरबाळे, श्रीमती कल्पना सातपुते, सौ. लीला मांगलेकर, सौ. संगीता साळुंखे, सौ. शोभा ढेरे, सौ. सुनीता इंचनाळकर, निशा भागवत, तसेच अनेक नागरिक व कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमादरम्यान जेष्ठ नागरिकांच्या आरोग्य, सुरक्षितता व कल्याणासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. या उपक्रमाचे उपस्थित नागरिकांनी मनापासून कौतुक केले.
हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे एक प्रेरणादायी उदाहरण ठरला असून, उपस्थितांना आनंद व प्रेरणा देणारा ठरला.
जेष्ठ नागरिकांसाठी मोफत बँक पासबुक वाटपाचा उपक्रम संपन्न
|