बातम्या
जोशी समाज मंदिरात मोफत डिजिटल कागदपत्र वितरण
By nisha patil - 9/26/2025 4:12:24 PM
Share This News:
जोशी समाज मंदिरात मोफत डिजिटल कागदपत्र वितरण
भाजपाच्या शिबिरातून नागरिकांना मोठा दिलासा
कोल्हापूर – शुक्रवार पेठ, गोंधळी येथील जोशी समाज दुर्गामाता मंदिरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोफत डिजिटल कागदपत्र वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरातून डिजिटल आधार कार्ड, डिजिटल रेशन कार्ड आणि पॅन कार्ड नागरिकांना देण्यात आले.
शिबिराचे आयोजन भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. भरत काळे यांनी केले होते. जिल्हाध्यक्ष श्री. विजय जाधव आणि मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले. तयार झालेली कार्डे आज लाभार्थ्यांना प्रत्यक्ष भेटून वितरित करण्यात आली.
वितरण सोहळा श्री. भरत काळे (जिल्हा उपाध्यक्ष) आणि श्री. सुशांत पाटील (उतरेश्वर मंडल सरचिटणीस) यांच्या हस्ते संपन्न झाला. या उपक्रमामुळे स्थानिकांना मोठा दिलासा मिळाला असून समाजातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
जोशी समाज मंदिरात मोफत डिजिटल कागदपत्र वितरण
|