ताज्या बातम्या
25 वर्षे मोफत वीज! महावितरणचा उपक्रम दारिद्र्यरेषेखालील आणि दुर्बल घटकांसाठी
By nisha patil - 11/13/2025 12:48:03 PM
Share This News:
कोल्हापूर : दारिद्र्यरेषेखालील (BPL) तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना 25 वर्षे मोफत वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणकडून मोठा उपक्रम राबविण्यात येत आहे.
‘स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप (स्मार्ट) योजना’ या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र घरावर 1 किलोवॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या योजनेमुळे लाभार्थींना स्वतःची वीज निर्मिती करण्याची आणि अतिरिक्त वीज महावितरणला विकण्याची संधी मिळणार आहे.
राज्य सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटांसाठी केंद्र सरकारच्या अनुदानाबरोबरच विशेष सहाय्य जाहीर केले आहे.
🔸 सर्वसाधारण ग्राहकांना – ₹10,000 अनुदान
🔸 अनुसूचित जाती व जमातीच्या ग्राहकांना – ₹15,000 अनुदान
या योजनेतून 100 युनिटपर्यंत वीज वापरणारे ग्राहक स्वतःचा खर्च वाचवून दीर्घकालीन बचत साध्य करू शकतात. सौरऊर्जेच्या माध्यमातून 25 वर्षे मोफत वीज मिळणार असल्याने हा प्रकल्प ऊर्जाबचतीसह पर्यावरणपूरक दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
25 वर्षे मोफत वीज! महावितरणचा उपक्रम दारिद्र्यरेषेखालील आणि दुर्बल घटकांसाठी
|