बातम्या

मंगलाताई निपाणीकर यांच्या पुढाकाराने  मोफत शासकीय सेवा शिबीर यशस्वी!

Free government service


By nisha patil - 7/17/2025 11:46:16 AM
Share This News:



मंगलाताई निपाणीकर यांच्या पुढाकाराने  मोफत शासकीय सेवा शिबीर यशस्वी!

घरोघरी सेवा पोहचवणारा उपक्रम जनतेतून भरघोस प्रतिसाद

सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेल्या मंगलाताई निपाणीकर यांच्या पुढाकाराने यादव नगरमध्ये आज एक अभिनव उपक्रम यशस्वीरित्या राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत डिजिटल आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला आणि नवमतदार नोंदणी यांसारख्या अत्यावश्यक सेवा सर्वसामान्य नागरिकांना मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या.

विशेष बाब म्हणजे, या शिबिरात केवळ सेवा नोंदणीपुरतेच न थांबता, आज आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्न व रहिवासी दाखले घरोघरी जाऊन वाटप करण्यात आले. त्यामुळे नागरिकांच्या वेळेची आणि पैशांची बचत झाली. या उपक्रमामुळे महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येक व्यक्ती आनंदी दिसून आला.

मंगलाताई निपाणीकर यांनी केवळ कॅम्पचे आयोजनच केले नाही, तर नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्या जागेवरच त्यावर उपाययोजना केल्या. त्यांचं हे कार्य समाजहिताच्या दृष्टिकोनातून अत्यंत आदर्शवत ठरत आहे. त्यामुळे परिसरात त्यांच्याबद्दल मोठा आदर निर्माण झाला आहे.

या कॅम्पमुळे अनेकांचे प्रलंबित दस्तावेज पूर्ण झाले असून, हा उपक्रम इतर प्रभागांमध्येही राबवावा, अशी मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे.


मंगलाताई निपाणीकर यांच्या पुढाकाराने  मोफत शासकीय सेवा शिबीर यशस्वी!
Total Views: 92