बातम्या
राजे फाउंडेशनतर्फे मोफत आरोग्य तपासणी
By nisha patil - 4/17/2025 4:15:51 PM
Share This News:
राजे फाउंडेशनतर्फे मोफत आरोग्य तपासणी
८६ कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी;
गडहिंग्लज नगरपालिकेतील ८६ कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी राजे फाउंडेशन व राजे बँकेच्या वतीने करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि स्व. विक्रमसिंहराजे घाटगे यांच्या स्मृती दिनानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
महागावच्या संत गजानन महाराज रुरल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी हृदय, डोळे, बीपी, साखर व जनरल तपासणी केली. औषधे वाटप व वैद्यकीय सल्लाही देण्यात आला. कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीत रवींद्र घोरपडे, देवानंद ढेकळे, दिगंबर विटेकरी आदींचा सहभाग होता. स्वागत सुदर्शन चव्हाण यांनी केले तर युवराज बर्गे यांनी आभार मानले.
राजे फाउंडेशनतर्फे मोफत आरोग्य तपासणी
|