बातम्या
दत्तवाड : जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप; ॲड. रमा फाटक यांचा पुढाकार
By nisha patil - 6/19/2025 6:58:25 PM
Share This News:
दत्तवाड : जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप; ॲड. रमा फाटक यांचा पुढाकार
दत्तवाड (ता. शिरोळ) : भाजपा कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस ॲड. सौ. रमा फाटक यांच्या शिष्यसंवर्धिनी प्रतिष्ठान व भाजपा कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष (किसान मोर्चा) राजगोंडा पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून दत्तवाड येथील जिल्हा परिषद कन्या विद्यामंदिर व कुमार विद्यामंदिर या शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमात बोलताना ॲड. रमा फाटक यांनी सांगितले की, “भविष्यात शिष्यसंवर्धिनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून या शाळांना संगणक, RO पाणी फिल्टर, पुस्तके व इतर शैक्षणिक सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.”
या वेळी भाजपा तालुका उपाध्यक्ष (मागासवर्गीय सेल) तेजस वराळे, भाजपा महिला मोर्चा तालुका उपाध्यक्षा सौ. मनीषा जोशी, माजी सैनिक अशोक नेर्ले, भूपाल खरपी, अजित वठारे, सुधाकर पट्टेकरी, मनोज पोवार, चंद्रकांत बिरणगे, शिरढोणे सर, निकम सर, मुख्याध्यापिका सौ. खटावकर मॅडम, कन्या शाळेचे मुख्याध्यापक श्री. यळगुडे सर, सर्व शिक्षक-शिक्षिका तसेच पत्रकार उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या उभारणीसाठी केलेला हा उपक्रम प्रेरणादायी ठरला असून, सामाजिक बांधिलकीची जाणीव जपणाऱ्या कार्यकर्त्यांचा हा उपक्रम स्तुत्य असल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी दिली.
दत्तवाड : जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप; ॲड. रमा फाटक यांचा पुढाकार
|